मधुमेहा बरोबर राहताना आणि त्याचे नीट व्यवस्थापन करताना काही अतिशय आवश्यक गोष्टी कराव्या लागतात त्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नियमितपणे रक्त शर्करेची पातळी तपासणे. त्यामुळे फक्त व्यायाम, अन्न आणि जीवनशैलीत केलेले बदल याचा साखरेच्या पातळीवर काय परिणाम होतो एवढच समजत नाही तर तुम्ही तुमच्या डायबिटीस एज्युकेटर किंवा व्यावसायिक हेल्थकेअर यांच्याशी बोलून त्याचं विश्लेषण करू शकता. रक्त शर्करेची पातळी नियंत्रित आणि स्थिर ठेवू शकता. तुम्ही तुमच्या रक्त शर्करेची पातळी तपासताना काही चुका करता का?
रक्त शर्करेवर लक्ष ठेवण्यासाठी अतिशय छोटेखानी बंदिस्त ग्लुकोमीटर चा वापर करता येतो ज्यामुळे सातत्याने साखरेच्या पातळीचा तपास करता येतो आणि मधुमेहाचं नीट व्यवस्थापन करता येते
याचा उपयोग योग्य काळजी घेऊन व नीट माहिती वाचून केला तर बऱ्यापैकी अचूक रक्तशर्करेचा आकडा मिळतो.
आपण आता पाहूया की रक्त शर्करेची पातळी तपासण्यासाठी ग्लुकोमीटर चा वापर करताना सामान्यतः कोणत्या चुका होतात.
रक्त शर्करा पातळी तपासताना प्रामुख्याने आठ चुका होतात त्या खालील प्रमाणे
मधुमेहाचं व्यवस्थापन करताना अगदी ग्लुकोमीटर विकत घेण्यापासून ते त्यावर रक्त शर्करा पातळी तपासण्यापर्यंत अनेक घटकांचा विचार करावा लागतो. हा विचार करताना मधुमेहींनी प्रामुख्याने खाली दिलेल्या चुका टाळाव्या.
रक्त शर्करा तपासताना होणाऱ्या चुका
- असे ग्लुकोमीटर विकत घेणे जे तुमच्या रोजच्या दैनंदिन मध्ये बसत नाही.
प्रत्येकाची जीवनशैली व गरज वेगळी असते पण एक गोष्ट मात्र सगळ्या मधुमेहींसाठी कायम असते ती म्हणजे रक्त शर्करेच्या पातळीची दररोज तपासणी करणे. जर तुम्ही नेहमी प्रवास करत असाल तर तुम्हाला असं ग्लुकोमीटर घ्यावं लागेल जे छोटे खानी आणि बंदिस्त असेल, आणि ज्यावर चटकन रक्त शर्करा पातळी मोजता येईल. एखादी वृद्ध व्यक्ती जर नेहमी घरात असेल तर त्यांना असं ग्लुको मीटर घ्यावा लागेल ज्याचा डिस्प्ले मोठा असेल, जो वापरायला आणि वाचायला सोपा जाईल.
विमा निधी (Insurance)
- असा ग्लुकोमीटर विकत घेणे जे आरोग्य विमा निधीच्या अंतर्गत कव्हर केलेलं नाही.
काही विमा कंपन्यांमध्ये आधीच नियम ठरलेले असतात ज्यात मधुमेही साठी वापरण्यात येणाऱ्या ग्लुकोमीटरला अंतर्भूत केलेलं नसतं. अशावेळी ग्लुकोमीटर घ्यावं आणि त्याचवेळी मधुमेहाच्या अनुषंगाने येणाऱ्या अनेक गोष्टी ज्यांना कव्हर उपलब्ध आहे अशा घ्याव्यात याचा उपयोग पुढे आयुष्यभर होतो कारण यात खूप मोठी किंमत अंतर्भूत केलेली असते.
मधुमेह
3) ग्लुकोमीटरचा अयोग्य सेटअप आणि तपासणी करण्याची चुकीची वेळ.
रक्त शर्करेची पातळी जर नियमितपणे ठराविक दिनांक दिवस वेळ या दिवशी केली नाही, तर आत्तापर्यंत ठेवलेली रक्त शर्करेची रीडिंग वाया जाऊ शकतात. जेवल्याबरोबर रक्त शर्करेची पातळी तपासणं ही सुद्धा खूप मोठी चूक आहे, कारण त्यामुळे चुकीचे रीडिंग मिळते. तुम्ही जर मधुमेही असाल तर तुम्ही अधिक काळजी घेतली पाहिजे.
हात धुणे
- रक्त शर्करेची पातळी तपासताना हात न धुणे.
रक्त शर्करेवर देखरेख करताना स्वच्छता राखणे ही फार महत्त्वाची बाब आहे. रक्त शर्करातपासण्या आधी हात धुणे अत्यावश्यक आहे. जरी तुमचे हात स्वच्छ दिसत असले तरीही हे करणे गरजेचे आहे विशेषतः रीडिंग घेण्या अगोदर जर तुम्ही एखादं फळ हाताळले असेल, तर असे निदर्शनास आले आहे की त्याचा तुमच्या रक्त शर्करेच्या रीडिंग वर परिणाम दिसून येतो.
सुई
5) बोटाच्या टोकावर टोचणे.
बोटाच्या टोकावर टोचणे हे वेदनादायी आहे, पण त्याच वेळी हेही आहे की त्यातून कमी रक्त बाहेर येते. बोटाच्या टोकांवर सगळ्या नसांची शेवटची टोकं असतात त्यामुळे ती आपल्या शरीरातील अतिशय संवेदनशील जागा आहे. सगळ्यात योग्य पद्धत म्हणजे आपला हात सरळ ठेवायचा, तळवा आणि बोटाचं टोक दाबायचं आणि सुईने टोचायचे. (prick)
तपासणी
- तपासणीनंतर येणाऱ्या निदानाची योग्य नोंद न ठेवणे.
सातत्याने रक्ताची तपासणी करणे पण त्यातून रक्त शर्करा पातळीचे जे निदान होतं त्या रीडिंगची नीट नोंद न घेणे हे तपासणी न करण्याइतकच वाईट आहे. जर मधुमेहीनीं त्यांच्या रक्त शर्करा पातळीची नोंद न ठेवून त्या रिडींग मध्ये येणाऱ्या बदलाबद्दल, फरकाबद्दल जर भान ठेवले नाही तर ते कधीही ठरवू शकणार नाहीत, किंवा त्यांना कळणार नाही की कशामुळे त्यांच्या रक्त शर्करा पातळीत वाढ होते.
सॅलड
- जेवण टाळणे.
जेवण टाळणे ही आपल्याला फार महत्त्वाची गोष्ट वाटत नाही, पण जर आपण आपल्या अवयवांच्या आरोग्याकडे आणि त्यांच्या कार्यक्षमते कडे लक्ष दिलं तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला जेवणाचं महत्त्व कळत. मधुमेहींसाठी सुद्धा आणि मधुमेह नसलेल्यांसाठी सुद्धा. जर जेवण टाळलं तर रक्त शर्करेची पातळी वाढते आणि त्याचा परिणाम म्हणून मधुमेहीं मध्ये इन्सुलिन प्रतिकार निर्माण होतो.
पाणी प्या
- शरीरातील आर्द्रता न राखणे
मद्याचे प्राशन टाळा, भरपूर पाणी प्या कारण जर शरीरातील आर्द्रतेच प्रमाण कमी झालं तर, रक्त शर्करेच्या पातळीचं संतुलन बिघडतं, शिवाय आर्द्रता कमी झाली म्हणजे डिहायड्रेशन झालं तर शरीरातील अनेक अवयवांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो.
या सगळ्या चुका आपण टाळू शकतो जर आपण अतिशय काळजीपूर्वक ग्लुकोमीटर चा वापर केला आणि रक्त शर्करेच्या रिडींग्ज काळजीपूर्वक घेतल्या. याशिवाय सातत्याने रक्त शर्करेच्या रीडिंग्ज घेणं तितकच महत्त्वाचं आहे जितकं इन्सुलिन घेणं. विशेषतः मधुमेहींनी याचं भान ठेवलं पाहिजे.
प्रत्येक वेळी येणार रीडिंग अचूकच असलं पाहिजे आणि ते मधुमेह व्यवस्थापन करणाऱ्या ॲप मध्ये सेव्ह करणे अतिशय गरजेचं आहे आणि सोयीचे देखील आहे.