मधुमेह रक्तातील वाढलेल्या साखरेच्या प्रमाणाशी संबंधित आहे. मधुमेहींचा आहार ठरवताना ज्या अन्नपदार्थांनी किंवा ज्या पद्धतीने रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते अशा गोष्टींचा विचार केला पाहिजे. असे काही अन्नपदार्थ आहेत ज्याचा उपयोग आपण मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी करू शकतो. मधुमेहींच्या आहारामध्ये कमी कर्बोदके असणाऱ्या अन्नपदार्थांचा समावेश करणे गरजेचे असते. काही पदार्थ तर साखरेची पातळी कमी करण्यासाठी सुद्धा मदत करतात. या लेखात आपण पाहूया की ज्या लोकांना मधुमेह झालेला आहे त्या लोकांना दालचिनीचे किती फायदे आहेत.
तुम्ही तुमच्या आहारात खालील गोष्टींचा नक्की समावेश करावा.
- दालचिनी (Cinnamon) :फार पूर्वीपासून दालचिनी तिच्या औषधी गुणधर्मामुळे प्रसिद्ध आहे. विशेषतः रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी दालचिनीचा उपयोग होतो. त्याचबरोबर दालचिनीचा वापर स्नायूंमध्ये येणारे पेटके(spasm), जंतुसंसर्ग, सर्दी ,आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या जखमा बऱ्या करण्यासाठी सुद्धा केला जातो.
- ॲपल साइडर विनेगर (Apple Cider Vinegar) : याचा फायदा दोन्ही प्रकारच्या मधुमेहासाठी होतो (डायबिटीस वन अँड डायबिटीस टू )विशेषतः जेवणानंतर रक्तातील साखरेची पातळी वाढू न देण्यासाठी एप्पल साइडर विनेगर चा उपयोग होतो.
- चिया सीड्स (Chia Seeds): चिया सीड्स मध्ये मुबलक प्रमाणात ओमेगा थ्री ओ ईल आणि अँटिऑक्सिडंट असतात. त्यामुळेच या सीड्स हा ऊर्जेचा एक उत्तम स्त्रोत आहे याचा वापर आपण अनेक खाद्यपदार्थांमध्ये करू शकतो. उदाहरणार्थ सॅलड्स, स्मूदीस .
- जवस किंवा आळशी (Flax Seeds) : जवसाचा उपयोग उपाशीपोटी असताना रक्त शर्कराची पातळी कमी करण्यासाठी होतो. याचा उपयोग कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी पण होतो. आणि जवसाच्या सेवनाने हिमोग्लोबिनचे प्रमाण पण योग्य राखण्यास मदत होते.
- मसूर (Lentils) : या मध्ये खाद्यपदार्थात असणारे फायबर भरपूर प्रमाणात असते विरघळणारे फायबर आणि न विरघळणारे फायबर हे दोन्ही मसूर मध्ये असतात. न विरघळणाऱ्या फायबर चा उपयोग कोठा साफ राहण्यासाठी होतो आणि आपला बद्धकोष्ठते पासून बचाव होतो. विरघळणाऱ्या फायबर मुळे हृदय रोगाचा धोका कमी होतो.
दालचिनीचे फायदे
अभ्यासातून असे सांगण्यात आले आहे की मधुमेहींच्या आहारात जर दालचिनीचा समावेश केला तर रक्त शर्करा आणि कोलेस्टेरॉल यांची पातळी व्यवस्थित राहते. टाईप टू प्रकारचा मधुमेह असणाऱ्यांच्या बाबतीत जेवणापूर्वीच्या साखरेच्या प्रमाणावर लक्ष द्यावे लागते, आणि दालचिनी या साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते. दालचिनीच्या सेवनाने इन्सुलिन संवेदनशीलता(insulin sensitivity) वाढते.
मधुमेही साठी दालचिनीचा वापर सुरक्षित आहे का? दालचिनीचा मधुमेहांच्या आहारात समावेश केल्याने रक्त शर्करेची पातळी नियंत्रणात येते का? हा वादाचा मुद्दा आहे. काहीजण म्हणतात दालचिनी मधुमेहींसाठी सुरक्षित नाही, तर काही म्हणतात की हा एक उत्तम घटक आहे. आरोग्य तज्ञांचं असं म्हणणं आहे की दालचिनीच्या सेवनाने पोट रिकामं होण्याचा वेग कमी होतो, आणि हीच गोष्ट रक्त शर्करा पातळी नियमित राहण्यासाठी फायद्याची आहे. याशिवाय दालचिनीचा उपयोग मधुमेहींची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी देखील होतो. फक्त एका गोष्टीची काळजी घेतली पाहिजे जर तुम्हाला यकृताचा काही आजार असेल, त्रास असेल तर मात्र योग्य वैद्यकीय सल्ला घ्या आणि मगच दालचिनीचा आहारात समावेश करा.
दालचिनीचा उपयोग करण्याचे पर्याय
- दालचिनीची पूड तुमच्या खाद्यपदार्थांवर शिंपडू किंवा पेरू शकता.
- तुम्ही तुमच्या पेयांमध्ये पण दालचिनी घालू शकता किंवा दालचिनी चहा घेऊ शकता.
- दालचिनीची पावडर मधात घालून उपाशी पोटी घेऊ शकता.
तुम्हाला सतत लक्ष ठेवून अंदाज घ्यावा लागेल की दालचिनीचा आणि काही खाद्यपदार्थांचा टाईप टू प्रकारचा मधुमेह असणाऱ्यांवर काय परिणाम होतो.घरी ग्लुकोमीटर असेल तर असं लक्ष ठेवणं सोपं जाऊ शकतं. डॉक्टरांच्या सहाय्याने त्यांच्या सल्ल्याने तुम्ही हेही ठरू शकता की रक्त शर्करेची पातळी नियमित राखण्यासाठी कोणत्या पदार्थाचा आहारात समावेश करावा, आणि त्या पदार्थात तुम्ही दालचिनी घालू शकता का? जेणेकरून तुमची रक्त शर्करा पातळी योग्य राहील.