मधुमेह रक्तातील वाढलेल्या साखरेच्या प्रमाणाशी संबंधित आहे. मधुमेहींचा आहार ठरवताना ज्या अन्नपदार्थांनी किंवा ज्या पद्धतीने रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते अशा गोष्टींचा विचार केला पाहिजे. असे काही अन्नपदार्थ आहेत ज्याचा उपयोग आपण मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी करू शकतो. मधुमेहींच्या आहारामध्ये कमी कर्बोदके असणाऱ्या अन्नपदार्थांचा समावेश करणे गरजेचे असते. काही पदार्थ तर साखरेची पातळी कमी करण्यासाठी सुद्धा मदत करतात. या लेखात आपण पाहूया की ज्या लोकांना मधुमेह झालेला आहे त्या लोकांना दालचिनीचे किती फायदे आहेत.
तुम्ही तुमच्या आहारात खालील गोष्टींचा नक्की समावेश करावा.
दालचिनीचे फायदे
अभ्यासातून असे सांगण्यात आले आहे की मधुमेहींच्या आहारात जर दालचिनीचा समावेश केला तर रक्त शर्करा आणि कोलेस्टेरॉल यांची पातळी व्यवस्थित राहते. टाईप टू प्रकारचा मधुमेह असणाऱ्यांच्या बाबतीत जेवणापूर्वीच्या साखरेच्या प्रमाणावर लक्ष द्यावे लागते, आणि दालचिनी या साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते. दालचिनीच्या सेवनाने इन्सुलिन संवेदनशीलता(insulin sensitivity) वाढते.
मधुमेही साठी दालचिनीचा वापर सुरक्षित आहे का? दालचिनीचा मधुमेहांच्या आहारात समावेश केल्याने रक्त शर्करेची पातळी नियंत्रणात येते का? हा वादाचा मुद्दा आहे. काहीजण म्हणतात दालचिनी मधुमेहींसाठी सुरक्षित नाही, तर काही म्हणतात की हा एक उत्तम घटक आहे. आरोग्य तज्ञांचं असं म्हणणं आहे की दालचिनीच्या सेवनाने पोट रिकामं होण्याचा वेग कमी होतो, आणि हीच गोष्ट रक्त शर्करा पातळी नियमित राहण्यासाठी फायद्याची आहे. याशिवाय दालचिनीचा उपयोग मधुमेहींची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी देखील होतो. फक्त एका गोष्टीची काळजी घेतली पाहिजे जर तुम्हाला यकृताचा काही आजार असेल, त्रास असेल तर मात्र योग्य वैद्यकीय सल्ला घ्या आणि मगच दालचिनीचा आहारात समावेश करा.
दालचिनीचा उपयोग करण्याचे पर्याय
तुम्हाला सतत लक्ष ठेवून अंदाज घ्यावा लागेल की दालचिनीचा आणि काही खाद्यपदार्थांचा टाईप टू प्रकारचा मधुमेह असणाऱ्यांवर काय परिणाम होतो.घरी ग्लुकोमीटर असेल तर असं लक्ष ठेवणं सोपं जाऊ शकतं. डॉक्टरांच्या सहाय्याने त्यांच्या सल्ल्याने तुम्ही हेही ठरू शकता की रक्त शर्करेची पातळी नियमित राखण्यासाठी कोणत्या पदार्थाचा आहारात समावेश करावा, आणि त्या पदार्थात तुम्ही दालचिनी घालू शकता का? जेणेकरून तुमची रक्त शर्करा पातळी योग्य राहील.