आशिया आणि आफ्रिका खंडातील देशांमध्ये गोड पदार्थ करण्यासाठी गुळाचा वापर केला जातो. आहार तज्ञ नेहमी गोड पदार्थ करताना साखरे ऐवजी गुळ वापरावा असा सल्ला देतात.कारण गुळ हा रासायनिक प्रक्रिया केलेल्या साखरेपेक्षा जास्त चांगला पर्याय आहे .गुळावर साखरे इतकी रासायनिक प्रक्रिया न झाल्याने त्यातली पोषक द्रव्य बऱ्यापैकी शाबूत राखली जातात.
गुळ मधुमेहीं साठी चांगला आहे की नाही हे आपण या लेखात वाचूया.
सर्वसाधारणपणे गुळ खजुराच्या झाडापासून किंवा उसापासून तयार केला जातो उसाचा रस किंवा खजुराचे sap पारंपारिक पद्धतीने मोठ्या उथळ कढयांमधून उकळवले जातात व त्यापासून गुळ तयार केला जातो
गुळाचे फायदे
आरोग्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात गुळाचे फायदे आहेत उदाहरणार्थ उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी गूळ उपयुक्त ठरतो कारण त्यात लोह असते. त्याचबरोबर गुळामुळे पचनक्रिया सुधारते आणि ऑक्सिडेटिव्ह ताणाशी मुकाबला करण्यासाठीही गुळाचा उपयोग होतो म्हणूनच पूर्वी घरातली मोठी माणसं सांगत असत की जेवणानंतर गूळ खावा. मधुमेहींसाठी योग्य आहार म्हणजे कमी ग्लायसेमिक इंडेक्स असणाऱ्या पदार्थांचा रोजच्या जेवणात समावेश. गुळाचा ग्लायसेमिक इंडेक्स उच्च असतो त्यामुळे ज्या लोकांना मधुमेह आहे त्यांच्यासाठी गुळ योग्य नाही.
गुळामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते का?
या प्रश्नाचं उत्तर होकारार्थी आहे ग्लायसेमिक इंडेक्स उच्च असल्यामुळे गुळ हा मधुमेहींसाठी व्यवहार्य पर्याय नाही. ग्लायसेमिक इंडेक्स पुरेसा उच्च असल्यामुळे गुळाचे सेवन केल्यास मधुमेहींसाठी ते अपायकारक ठरू शकते. गुळाचा साखरे एवढा उच्च ग्लायसेमिक इंडेक्स नसला तरी रक्तात तो खूप पटकन शोषला जातो याच कारणामुळे मधुमेहींना आहारात गुळ न वापरण्याचा सल्ला दिला जातो.
ज्या लोकांना मधुमेह असतो त्यांनी कुठलाही गोड पदार्थ खाणे टाळावे. जर रक्तातील साखरेच्या पातळीवर नियंत्रण ठेवायचे असेल तर गोड पदार्थाच्या आवडीला दूर सारावे.
साखर आणि गूळ सारखेच अपायकारक असतात का?
साखर किंवा गूळ या दोन्हीच्या सेवनाने तुमच्या रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम होतो. खूप जणांचा असा गैरसमज असतो की साखरे ऐवजी गूळ वापरला तर त्याचा रक्तातील साखरेवर फार परिणाम होत नाही पण हे असत्य आहे. गुळामध्ये सुक्रोज हा साखरेचा प्रकार असतो ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. सुक्रोज आपल्या शरीराकडून तत्परतेने शोषली जाते. म्हणजे तात्पर्य काय तर सुक्रोज ही इतर साखरे इतकीच धोकादायक असते. साखरे ऐवजी गूळ वापरणे हा मधुमेह नसलेल्या व्यक्तींसाठी अतिशय योग्य निर्णय आहे. मधुमेहींसाठी लो ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करावा असं डॉक्टर सांगतात त्यामुळे गूळ हा पर्याय त्यांच्यासाठी उपलब्ध नाही.
आत्तापर्यंत आपण जे वाचले त्यावरून आपण असे म्हणू शकतो की ज्यांचे आरोग्य अतिशय उत्तम आहे आणि ज्यांना मधुमेह नाही ते लोक पांढऱ्या साखरे ऐवजी गूळ वापरू शकतात पण मधुमेह असणाऱ्यांनी गुळ संपूर्णपणे टाळायचा आहे.