मधुमेहींच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याचे चिन्ह आणि त्याची लक्षणे - Diabetes Blog
Home»Blog»Trending » मधुमेहींच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याचे चिन्ह आणि त्याची लक्षणे

मधुमेहींच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याचे चिन्ह आणि त्याची लक्षणे

7275 0
क्या आपका ब्लड शुगर लेवल बढ़ रहा है
3.6
(12)

रक्तातील साखरेच्या पातळीबद्दल समजून घेणे ही मधुमेह व्यवस्थापन किंवा त्याचा प्रतिबंध करण्यासाठीची किल्ली आहे. रक्तातील साखरेची पातळी कधी वर जाते आणि कधी खाली येते हे समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे, आणि हे आपण तेव्हाच ओळखू शकतो जेव्हा आपण याच्या काही नेहमीच्या खुणा किंवा लक्षण यांचा विचार करून ते समजून घेतो.

या लेखात आम्ही तुम्हाला उच्च रक्त शर्करेबद्दल( हाय ब्लड शुगर) आणि त्याच्या आठ नेहमीच्या लक्षणांबद्दल सांगणार आहोत. ज्याकडे तुम्ही लक्ष ठेवले पाहिजे आणि खबरदारीही घेतली पाहिजे.

उच्च रक्त शर्करा म्हणजे काय ?

उच्च रक्त शर्करा (हाय ब्लड शुगर) म्हणजे आपल्या रक्ताच्या प्रवाहात उपस्थित असलेली साखर नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात आढळते याला हायपरग्लासेमिया असेही म्हणतात. ही स्थिती तात्पुरती असू शकते जर त्यावर योग्य वेळी योग्य उपचार केले गेले तर.

जरी यकृत आणि स्नायू काही प्रमाणात साखरेची निर्मिती करत असले तरी जास्तीत जास्त ग्लुकोजचा पुरवठा आपल्याला आपण जे अन्न खातो त्यातूनच होत असतो. आपल्या शरीरातील रक्तपेशींकडे इन्सुलिनच्या साह्याने ग्लुकोज वाहून नेले जाते. इन्सुलिन हे एक संप्रेरक(Hormone) आहे ज्याची निर्मिती पॅनक्रियाज् या अवयवात होते. पॅनक्रियाज् हे पोटाच्या अगदी बाजूला असते. साधारणतः पॅनक्रियाज् इन्सुलिन रक्तपेशी मध्ये सोडते. काही जणांमध्ये शरीर इन्सुलिन निर्माण करण्यास असमर्थ असते (टाईप वन डायबिटीस) तर काहींमध्ये निर्माण झालेलं इन्सुलिन वापरण्याची असमर्थता असते (टाईप टू डायबिटीस) अशावेळी पेशींना गरज असलेले ग्लुकोज मिळत नाही आणि ते तसेच रक्तामध्ये साचून राहते आणि याचमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते.

ग्लुकोमीटर चा उपयोग रक्तातील साखरेची पातळी दर्शविण्यासाठी होतो याच्या साह्याने आपण रक्तातील साखरेच्या पातळीवर देखरेख करू शकतो किंवा लक्ष ठेवू शकतो. यासाठी फक्त आपल्याला बोटाच्या टोकातून एक थेंब रक्त काढून टेस्ट ट्रीप वर ठेवायचा आणि ती स्ट्रीप ग्लुकोमीटर च्या आत सारायची. काही क्षणातच आपल्याला आत्ता आपल्या शरीरातील रक्तात साखरेची पातळी किती आहे हे समजून घेते.

रक्तामध्ये साखरेची पातळी वाढल्याची चिन्ह आणि लक्षणं

एखाद्या व्यक्तीला हायपरग्लायसेमिया झालाय किंवा त्याची रक्तातील साखरेची पातळी जास्त आहे हे खाली दिलेल्या पैकी काही किंवा सर्वच खुणा त्याच्यात आढळल्या तर आपण तसे म्हणू शकतो.

  1. धूसर दृष्टी ( Blurry Vision )

मधुमेह ही वाढत जाणारी स्थिती आहे. त्यामुळे रक्तातील साखरेच्या वाढलेल्या पातळीमुळे शरीरात जी गुंतागुंत निर्माण होते ती फक्त थोड्या काळापूरती मर्यादित न राहता दीर्घ काळापर्यंत टिकून राहते. एक महत्त्वाचा आणि सर्वसाधारणपणे दिसून येणारा परिणाम म्हणजे मधुमेहामुळे ब्लड वेसल्सचे नुकसान होते.

मधुमेह जर खूप काळ तुमच्या शरीरात ठाण मांडून बसला तर डोळ्याजवळच्या ब्लड वेसल्सला दुखापत होते आणि आपल्याला धूसर दिसू लागते. यात सुरुवातीला डोळ्यातले द्रव्य आत बाहेर करत असते त्यामुळे डोळ्यातल्या लेन्सला सूज येते, त्याचा आकार बदलतो आणि त्यामुळे दृष्टी धूसर होते. ही स्थिती पूर्ववत होऊ शकते जेव्हा रक्तातील साखरेची पातळी कमी होते.

  1. वारंवार लघवीला जावं लागणे (Frequent Urination)

या स्थितीला पॉली युरिया म्हणतात. वारंवार लघवीला जावं लागणे हे सगळ्यात महत्त्वाचं आणि सर्वसामान्यपणे आढळणारे लक्षणं आहे. सतत लघवीला जावं लागत असेल तर समजावं की साखरेच्या पातळीत काहीतरी गडबड झाली आहे. या स्थितीत शरीरातून नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात मूत्र बाहेर टाकले जाते. ‘पॉली युरिया’ ही स्थिती जेव्हा येते तेव्हा शरीरातून साधारणपणे तीन लिटर मूत्र बाहेर फेकले जाते आणि सर्वसाधारणपणे आपल्या शरीरातून रोज दोन लिटर मूत्र बाहेर टाकले जाते.

  1. भूक वाढणे (Increased Hunger)

जेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते तेव्हा भुकेचे प्रमाणही वाढते. या स्थितीला वैद्यकीय भाषेत ‘पोलीफेजिया’ असे म्हणतात. या स्थितीत माणसाला त्याची भूक वाढली आहे असं सतत जाणवत असतं, कारण त्याच्या स्नायूंना पुरेशा प्रमाणात ग्लुकोज मिळत नसते. हे सुद्धा ,एक महत्त्वाचे चिन्ह आहे की रक्तातील साखरेची पातळी वाढली आहे, आणि याचाच परिणाम म्हणून पुढे इन्सुलिन प्रतिकार निर्माण होतो. जर शरीर इन्सुलिनचा वापर स्नायूंना ग्लुकोज पुरवण्यासाठी करू शकत नसेल तर पेशी आणि स्नायू अचानकपणे मेंदूच्या पेशीं कडे अन्नासाठी वळतात.

4) जास्त प्रमाणात तहान लागणे (Excessive Thirst)

कितीही पाणी प्यायलं तरीही तुम्हाला समाधान मिळत नसेल, आणि सतत तहान लागत असेल, तर समजावं की रक्तातील साखरेचे प्रमाण तपासून घेण्याची वेळ आली आहे. असं होतं कारण आपल्या शरीरातलं पाणी काढून घेतल्यासारखं आपल्याला वाटतं. आणि हे होण्याचे कारण म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त साखर रक्तामध्ये आढळते. अश्या स्थितीत आपलं शरीर पेशींकडून द्रव्य ओढून घेते रक्त सौम्य( dilute) करते, आणि रक्तातील साखरेची पातळी कमी करते. या सगळ्या प्रक्रियेत पेशी डिहायड्रेट होतात आणि त्या मेंदूकडे अजून पाणी हवं आहे अशी मागणी करतात. याचा थेट संबंध वारंवार लघवीला जावं लागणं याच्याशी आहे. कृपया लक्षात ठेवावे की जेव्हा एखाद्या मध्ये ही तीनही लक्षणे एकत्र दिसतात तेव्हा त्याची रक्तातील साखर वाढलेली असण्याची शक्यता असते पण काही वेळा शरीरातील द्रवांचे असंतुलन झालेलं असतं त्याचा थेट संबंध मात्र रक्तातील वाढलेल्या साखरेची असतोच असं नाही.

  1. शीण, थकवा (Fatigue)

जेव्हा आपल्या शरीरातील पेशींना आणि स्नायूंना ग्लुकोजच्या स्वरूपात ऊर्जा मिळत नाही तेव्हा थकवा, शीण जाणवतो. हे सुद्धा रक्तातील वाढलेल्या साखरेचे लक्षण आहे. शरीराला थकवा जाणवतो तो इन्सुलिन प्रतिकारा मुळे, आणि तो निर्माण होतो साखरेची पातळी वाढल्यामुळे. कृपया लक्षात घ्या थकवा आणि दमणूक या दोन वेगवेगळ्या स्थिती आहेत. माणूस दमलेला असेल तर आरामा नंतर तो बरा होतो. ताजातवाना होतो, पण त्याला जर शीण किंवा थकवा आला असेल तर फक्त आरामाने तो बरा होत नाही.

  1. तोंडाला कोरड पडणे (Dry Mouth)

याला वैद्यकीय भाषेत ‘झेरॉस्ट्रोमिया’ म्हणतात. तोंडात जर पुरेशा प्रमाणात लाळ नसेल तर तोंडाला कोरड पडते. लाळ फार महत्त्वाचे कार्य करत असते. लाळे मुळे जिवाणूंचे प्रमाण नियंत्रित राहते, आणि दात आणि हिरड्या यांच्या भोवतीच आम्लं निघून जाते.

तोंडाला कोरड पडणे हे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याचं अजून एक महत्त्वाचं लक्षणं, ज्यामुळे सतत यीस्ट चा संसर्ग होतो. सतत लघवीला जावं लागणे यामुळे सुद्धा तोंडाला कोरड पडते. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की मधुमेह असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तोंडाला कोरड पडेलच असं नाही, आणि मधुमेह नसेल तरीही काही वेगळ्या कारणाने सुद्धा तोंडाला कोरड पडू शकते.

7) चित्त एकाग्र करताना अडथळे येणे (Difficulty in concentration)

अभ्यासातून असं निदर्शनास आले आहे की रक्त शर्करेची वाढलेली पातळी एकाग्रता करताना अडथळा निर्माण करू शकते. जरी मेंदू हा पूर्णपणे ट्यून्ड असणारा अवयव असला तरी तो रक्त शर्करा वाढलेल्या स्थितीला संवेदनक्षम पण असतो. जसं आपण वर म्हणलं की दीर्घकाळापर्यंत जर रक्त शर्करेचे प्रमाण जास्त असेल तर ते तुमच्या वेसल्सना नुकसान पोहोचवू शकते. मेंदूला नीट कार्यरत राहण्यासाठी ऊर्जेची गरज असते आणि इन्सुलिन प्रतिकारामुळे ग्लुकोज मेंदूच्या पेशी पर्यंत वाहून नेले जात नाही, आणि त्यामुळे आपल्याला चित्त एकाग्र करण्यासाठी अडथळे निर्माण होतात.

8) जखम बरी होण्यासाठी नेहमीपेक्षा जास्त वेळ लागणे (Wounds taking longer than usual to heal)

रक्त शर्करा जास्त प्रमाणात असेल तर जखम बरी होण्यास नेहमीपेक्षा जास्त कालावधी लागतो. ब्लड वेसल्सना नुकसान पोहोचल्यामुळे गरज असलेली पोषक द्रव्ये नीट मिळू शकत नाहीत, त्यामुळे जखम लवकर बरी होत नाही. शिवाय याचमुळे त्वचेला जखमेची होणारी संवेदना देखील बोथट होते. जखम झालेली न कळल्याने त्याच्याकडे दुर्लक्ष होऊन, त्यावर वेळेवर उपचार होत नाही आणि तिथे संसर्ग वाढू शकतो.

रक्त शर्करा वाढू देण्यासाठी स्वतः स्वतःची काळजी घेणे,

यासाठी खाली काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्यामुळे तुम्ही स्वतःची स्वतः काळजी घेऊ शकता.

  • स्वतःची रक्त शर्करा पातळी नियमित तपासणे हे तुम्ही करू शकता जर तुमच्याकडे ग्लुकोमीटर असेल तर.
  • तुमचं जेवण कधीही टाळू नका सकाळचा नाश्ता तर नियमित करा.
  • साखर असलेले पदार्थ टाळा उदाहरणार्थ सोडा आणि कॅफेन फ्री पदार्थांपासून दूर राहा.
  • व्यायामाने तुमची रक्त शर्करा पातळी कमी होऊ शकते पण जर तुमची रक्त शर्करा पातळी 240mg/dL च्या वर असेल तर प्रथम रक्तातील कीटोन तपासून घ्या आणि अशा स्थितीत व्यायाम करू नका
  • “डायबिटीस एज्युकेटर” च्या मदतीने तुमचा आहार जीवनशैली याबद्दलची माहिती घ्या त्यानुसार गरज असतील ते बदल करा आणि मधुमेहासाठी योग्य असा आहार आणि योग्य अशी जीवनशैली अंगीकारा.
  • जर रक्त शर्करेचे प्रमाण योग्य नसेल तर डॉक्टरांशी बोलून, त्यांच्या मदतीने औषधोपचार घ्या.

लक्षण पटकन कळणे, आणि त्याच्यावर लगेच उपचार करणे हा रक्त शर्करा पातळी वाढू न देण्याचा एक मार्ग आहे आणि त्यामुळे शरीरातील गुंतागुंत पण वाढत नाही.

डायबिटीस एज्युकेटर’ चा सल्ला घ्या तुम्हाला जर वर सांगितलेल्या लक्षणांपैकी काही जाणवत असतील तर त्याची मदत घ्या. उशीर होण्यापेक्षा लवकर मदत घेणे केव्हाही फायद्याचे असते.

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 3.6 / 5. Vote count: 12

No votes so far! Be the first to rate this post.

We are sorry that this post was not useful for you!

Let us improve this post!

Tell us how we can improve this post?

Himani Maharshi

Himani Maharshi

A master of working behind the scenes. Himani is an experienced content and brand marketing expert with a passion for transforming ideas into compelling narratives. With 5+ years of experience in the dynamic field of content creation, I have navigated the landscapes of media, ed-tech and healthcare. From crafting SEO-optimized masterpieces to expertly leading content teams, my journey is marked by a commitment to excellence.

Leave a Reply