दीपा कांबळे- वय 41, गृहिणी, राहणार कोल्हापूर (महाराष्ट्र) टाईप टू मधुमेह झाल्याचं निदान. दीपा कांबळे या 41 वर्षांच्या गृहिणी कोल्हापूर मध्ये आपले पती व दोन मुलांबरोबर राहतात. 2019 मध्ये त्यांनी जेव्हा थायरॉईडची टेस्ट केली तेव्हा त्यांना कळलं की त्यांना टाईप टू मधुमेह झाला आहे. त्यांच्या फार शारीरिक श्रम नसलेल्या जीवनशैलीचा या मधुमेहांशी खूप जवळचा संबंध होता.
” मला 2019 मध्ये कोव्हीड झाला आणि माझी रक्त शर्करा पातळी एकदम 600mg /dL एवढी वर गेली. डॉक्टरांनी सांगितलं यांची वाचण्याची शक्यता फक्त पंधरा टक्के आहे. माझा विश्वासच बसत नव्हता की, मला मधुमेह झाला. पूर्वी माझ्यावर अनेक शस्त्रक्रिया झाल्या होत्या त्यामुळे मला आणि माझ्या पतीला खूप भीती वाटत होती. मी शुगर आणि थायरॉइडच्या विशेषतज्ज्ञांचा सल्ला घेतला, आणि 48 युनिट इन्सुलिन दर दिवशी घेणे सुरू केले, ते सगळं खूप वेदनादायी होतं. माझं वजन वाढू लागलं, माझ्या त्वचेवर सूज यायला लागली.
दीपा कांबळे त्यांचा मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी सोप्या आणि स्वस्त पर्यायाच्या शोधात होत्या, आणि त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना सल्ला दिला की तुम्ही नियमितपणे तुमच्या रक्त शर्करेवर लक्ष ठेवा त्याची तपासणी करा.
“मला मार्च 2022 मध्ये BeatO बद्दल इंस्टाग्राम वरील जाहिरातीतून माहिती समजली. मी रक्त शर्करेची पातळी तपासणाऱ्या योग्य उपकरणाच्या (device) शोधात होते आणि मला हे ग्लुकोमीटर मिळाले जे अतिशय परवडेल अशा किमतीचं आहे. मी ऑर्डर केली आणि माझ्या घरी ते पाच दिवसात पोहोचलं.”
श्रीमती दीपा कांबळे यांनी सहा महिन्यांचा BeatO चा “मधुमेह उलट कार्यक्रम” (Diabetes Reversal Programme) घेतला. त्यांना रोज तीस मिनिटे चालण्याचा सल्ला दिला आणि त्यांच्या आहारात पण बदल सुचवण्यात आले. “या योजनेची (प्लॅन )सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे ती अतिशय परवडणारी आहे आणि मी डॉक्टर नवनीत आणि माझे आरोग्य शिक्षक (हेल्थ कोच) श्रीमती हिमांशी आणि श्रीमती अक्षिता यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी काटेकोरपणे पाळते. त्यांनी मला सगळ्या गोष्टी लाइव्ह सेशन मध्ये समजावून सांगितल्या आणि Curv Glucometer चा कसा वापर करायचा ते ही सांगितलं.”
या केअर प्रोग्रॅमच्या कालावधीत दीपा कांबळे यांनी अगदी आश्चर्यजनक सुधारणा दाखवली. त्यांचं Hb1Ac 11.6% पासून 7.9% पर्यंत खाली आले. त्या पूर्वी 48 युनिट्स इन्सुलिन घेत होत्या त्याचं प्रमाण आता शून्यावर आलं, आणि त्या आता अधिक उत्साही आणि तणाव मुक्त जीवन जगत आहेत.
” केअर प्रोग्रॅम” मुळे माझी मधुमेहाची लक्षण 90 टक्क्यांनी कमी झाली.”
त्यांना सतत थकवा, शरीराला खाज येणे अशी लक्षणे दिसत होती ती आता पूर्णपणे गेली आहेत. त्या म्हणतात त्यांच्या आरोग्य शिक्षकांचा त्यांची रक्त शर्करा पातळी सुधारण्यात फार मोठा वाटा आहे. त्यांचे आरोग्य शिक्षक नियमितपणे त्यांच्या जीवनातील पदार्थांची माहिती घेतात ,त्याचे विश्लेषण करतात आणि त्यानुसार त्यांच्या आहारात सुधारणा किंवा बदल करण्याचा सल्ला देतात. त्या सांगतात की त्यांना सुचवलेले पदार्थ मधुमेह झालेले लोक खाऊ शकतात अशा घटकांपासूनच बनवलेले असतात. जे सहज उपलब्ध असतात.
“माझ्या आरोग्य शिक्षकांचा माझं HbA1c कमी करण्यात खूप मोठा वाटा आहे. त्यांच्या मदतीने मी हे बदल करू शकले. मी माझी रक्त शर्करेची पातळी कधीच नियंत्रणात आणू शकले नसते जर मी BeatO App ची जाहिरात इंस्टाग्रामinstagram वर बघितली नसती.”
दीपा कांबळे यांना प्रवास करायला, आणि कुटुंबाबरोबर वेळ घालवायला खूप आवडत. त्या आता त्यांच्या सगळ्या आवडत्या गोष्टी करू शकतात उदाहरणार्थ गिर्यारोहण,( ट्रेकिंग) नृत्य आणि तेही सर्व काळजी मुक्त पद्धतीने करू शकतात.
त्या BeatO App च वर्णन” माँ के जैसा” असं करतात.
मधुमेहांशी संबंधित अडथळे पार केल्याने त्यांच्यात एक वेगळाच आत्मविश्वास आला आहे. त्यांनी त्यांच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जे त्यांचा मधुमेह उलट करू इच्छितात अशा सगळ्यांना “BeatO केअर प्रोग्रॅम” घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यांचं म्हणणं आहे की हा प्रोग्रॅम मधुमेह असणारे व नसणारे या दोघांसाठीही उपयुक्त आहे.
तुमचा “डायबिटीस रिव्हर्सल” चा प्रवास आजच सुरू करा.